Samir Lande 06 Feb 2026 कहानियाँ प्यार-महोब्बत समीरलांडे, जाबकुणासठाऊक samirlande 7288 0 Marathi :: मराठी
प्रस्ताविका
काही प्रेमकथा संपतातकारण प्रेम कमी पडतं म्हणून नाही, तर समाज मोठा पडतो म्हणून. ही गोष्ट आहे खिडकीआड फुललेल्या प्रेमाची, आणि पहाटेच्या आधी तुटलेल्या विश्वासाची. उरतात फक्त आठवणी…आणि एक न बोललेलं पत्र.
माधव = केशव चे वडील
केशव = माधव चा मुलगा , तुळसा चा प्रियकर
गोविंद = तुळसा चा भाऊ
तुळसा = गोविंद ची बहिण , केशव ची प्रियसी
{दृश्य ~१}
केशव ~ ( दिवस भर office मध्ये वन~वन केल्या नंतर केशव जेव्हा सायंकाळी घरी परततो तेव्हा दरवाज्याच्या कडीला पोस्टमन ने अडकवलेले एक पत्र त्याला दिसते ,
केशव ते पत्र घेऊन आत जातो हा पत्र कोणी पाठवला असेल हा प्रश्न व दिवस भरातली थकान एकत्र त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती . तो बँग बाजूला ठेवतो व समोर असलेला टेबल फॅन चालू करतो आणि स्वतः खुर्ची ( सोफा ) वर बसून हातातील पत्र उंगडू लागतो .
पत्र उंगडताच त्यातील पहिली ओळ केशव च्या चेहऱ्यावर एक विचित्र शांतता आणते .
(प्रिय तू,
आता ज्याला मी हरवलेलं आहे पण आपलंसं म्हणते.)
एवढ वाचतात फॅन च्या हवेने हातातील पत्र त्याच्या जीवा प्रमाणे फडफडू लागले व फॅनच्या त्या अलगद हवेत केशव जुन्या आठवणी मध्ये बुडून जातो )
{दृश्य~२} भूतकाळ
( सायंकाळी 6 च्या दरम्यान केशव चारपाई वरती झोपलेला आहे . त्याच वेळी त्याचे वडील (माधव) तिथे येतात )
माधव ~ ( केशवला जागी करत )
केशा ये केशा आर.. उठ, काय येळ हाय का झोपायची आर... गाय~गुर घरी आली अन् तू खुशाल पसरलाय.
केशव ~ ( आराध्य झोपेत )
ओ... आबा झोपू द्या ना रात भर जागरण होईल शेतात पाणी भरायला
माधव ~ आर .. दुपार पासं झोपलाय पोरा आता 6 वाजले तरी जागरण होईल वय .
केशव ~ ( एवढ ऐकताच केशव ची झोप उडते केशव चकित होऊन पटकन उठून बसतो व ओरडतो )
काय 6 वाजले
( भूतकाळ त्याचा डोळ्यात उतरतो व आठवणीने गाठलेला चेहरा करत त्याला आठवते की आज 4 वाजता आपण तुळसा ला भेटण्याचा वायदा केला होता )
माधव ~ ( तेवढ्यात वडील ( माधव ) त्याला शुद्धी वर आणतात व म्हणतात )
काय रे काय झालं आस कुत्र्यागत किंचाळून काय उठला
केशव ~ जागरण नाय आबा आता गोंधळ होईल
( एवढ बोलून भेटण्याच्या जागेच्या दिशेने धाव घेतो त्या जागेवर पोचताच त्याला कुणीही दिसत नाही , निराशा त्याचा चेहऱ्यावर दिसू लागते )
केशव ~ ( भेटण्या जागी निराश होऊन स्वतःशीच बोलू लागतो )
खूप रागावलेली असेल , मलाच अक्कल नाही एवढ कोण झोपतय
( व निराश होऊन घरी परततो )
{दृश्य~३}
रात्री 9:30 वाजता केशव शेतात पाणी लावायला निघतो
माधव ~ कान टोपी घेतली का दादा
केशव ~ हो घेतली
माधव ~ सावकाश जा घाई करू नको आणि हो जरा सावध रहा बिबट्याचं प्रकरण वाढलय एवढ्यात , मी येऊ का सोबत आधार म्हणून
केशव ~ कशाला काळजी करताय एवढी आबा काय करणार उगाच थंडी गारठा अंगावर घेऊन जा घ्या झोपून निवांत
माधव ~ लेकरु बाहेर असताना बाप निवांत झोपल वय
केशव ~ नका काळजी करू शेतात चाललोय मैदानात जंग साठी नाय
( एवढ बोलून केशव गाडी घेऊन शेताच्या दिशेने निघतो , आज प्रियसी ला न भेटण्याचे दुःख मनात होते . शेताची अर्धी वाट गाठताच केशव गाडी थांबवतो व घड्याळ पाहून मनातल्या मनात बोलू लागतो )
केशव ~ ( स्वतःशी )
शेतातील मोटर चालू करण्यासाठी लाईट 11 वाजता येईल आजुन एक दिड तास शिल्लक आहे माझ्याकडं एवढ्यात तुळसा ला भेटणं होऊन जाईल
( एवढ विचार करून केशव गाडी थेट तुळसाच्या घराकडे घेतो . गाडी घरा पासून थोड्या लांबीवर झाडी आड उभी करून खिशात 4~5 खडे उचलून घेतो व अंधाराची आड घेत तुळसाच्या रूमच्या खिडकीपर्यंत पोहचतो पाहतो तर काय तुळसा तिच्या कामात व्यस्त होती तुळसा चे लक्ष आपल्याकडे ओढण्या साठी केशव खिशात भरलेले खडे तुळसाच्या दिशेने फेकतो, खड्यांचा आवाज होताच तुळसाच लक्ष खिडकीकडे जातो खिडकीत केशव ला पाहून तुळसा घाबरून खिडकीत धाऊन जाते )
तुळसा ~ ( केशव ला खिडकीत पाहून घाबरत )
केशव तू इथे काय करतोस कुणी बघितलं तर
केशव ~ शांत, शांत, शांत
तुळसा ~ काय शांत शांत मला तुझं एक काही ऐकायचं नाही दादा ने बघितलं तर ते आपल्या दोघांना सोडणार नाही तू जा बर इथनं
केशव ~ तू ऐक तर
तुळसा ~ काय ऐकू तुझं Please ना रे केशव कुणी बघितलं तर काही खर नहीं माझं
केशव ~ ( प्रेमाने हक्काचा दम देत )
शु.... ऐक माझं , ( तुळसा शांत उभी राहते )
मला इथे येताना कुणीच बघितलं नाही आणि राहिला विषय तुझा दादा चा तर ते बैलगाडा शर्यती साठी बाहेर गावी गेलेत विसरली का ?
तुळसा ~ ( भोळ्या स्वभावाने थोड्यावेळ शांत उभी राहते आणि मग )
अरे हो मी तर विसरलेच होते दादा घरी नाही ते
( तीतक्यात तिला आठवते की आज हा मला भेटायला नही म्हणून लगेच त्याचा समोर पाठ फिरवून उभी राहते )
तुळसा ~ (तुळसा पाठ फिरवून)
आत्ता कशाला आला जेव्हा यायचं होत तेव्हा तर नाही आला
केशव ~ ( प्रेमळ गोड भावनेत )
मी भेटण्यास आलो नाही म्हणून तुला राग आला ना ?
तुळसा ~ मला कशाला राग येईल मी आहेच कोण
केशव ~ अच्छा ? तुला नहीं माहित कोण आहेस तू .
ओ मालकीण बाई आहों मागे वळा की आस.. श्वासाला रुद्या पासून लांब नाही ठेऊ
तुळसा ~ असच गोड बोलून फसवलास तू मला
केशव ~ फसवल, आणि मी
तुळसा ~ हो तूच , पहिले गोड गोड बोलून फसवल आणि आता वेळ तरी आहे का माझ्या साठी तुझा पाशी आज भेट म्हणून सांगितलं आणि स्वतःच आला नाही
केशव ~ आग येणारच होतो मी पण डोळ्याला डोळा कसा लागून गेला समजलच नहीं
तुळसा ~ बीना हाता पायाचे कारण नको देऊ , खरं तर मन भरलं तुझं म्हणून असा वागायला लागला तू
केशव ~ ( भाऊक होऊन )
ये तुळसा आस काही बोलू नको बरं तू असल काही बोलू लागली की जीव वर खाली होतो बघ माझा, आग जीव गमवण्या पेक्षा तुला गमावण्याची भीती जास्त वाटती मला
शेवटची चूक म्हणून माफ कर पाहू मला ( खिडकीतून हात समोर घेत ) की पाया पडू तुझा
तुळसा ~ नाय नको इतकी पण निर्दयी नाही मी, पण शिक्षा मात्र नक्कीच भेटेल तुला
केशव ~ शिक्षा , शिक्षा कोणती , आणि अशी परक्या सारखी पाठ करून का उभी आहे , माझा चेहरा पण बघणार नाही का आता
तुळसा ~ ( माघे सरकून खिडकी शेजारी पाठ लाऊन बसते )
नाही, बघणार पण नाही आणि दाखवणार पण नाही
केशव ~ ( केशव देखील बाहेरच्या बाजूला खिडकी ला पाठ लाऊन बसतो व चंद्राच्या दिशेने पाहत )
ठीक आहे नको दाखवू चेहरा आणि पाहू पण नको
चेहऱ्यात काय ठेवलंय सुंदर तर तो चंद्र पण आहे. खरी जादू तर तुझा आवाजात आहे एकदा की कानावर पडलं की कानाने अमृत पिल्या सारखं वाटतं
तुळसा ~ ( विषय बदलावत )
का नहीं आला रे दुपारी भेटायला
केशव ~ आग आत्ता 11 वाजता शेतात पाणी सोडायला जायचं आहे रात्र भर जागरण होईल म्हणून झोपाव थोड म्हटल पण गाढ झोपेत जाग आलीच नहीं
तुळसा ~ म्हणजे आत्ता पण वेळ नाही तुझा पाशी
केशव ~ आस काही नहीं, वेळ तर खूप छोटी गोष्ट आहे तुझा समोर खर तर पूर्ण आयुष्य तुझा प्रेमात तुझा करिता सोपवल आहे मी
( असेच प्रेमाच्या गंधात दोघेही इतके हरून जातात की केव्हा डोळ्याला डोळा लागून जातो ते समजतच नहीं )
{दृश्य~४}
(सूर्य उगवण्याआधी आकाश फिकट निळसर, गुलाबी, केशरी लालसर रंगाने भरून आले होते . ) केशव व तुळसा अजूनही जागी झाले नव्हते आणि तुळसा चा भाऊ गोविंद हा बाहेर गावाहून सकाळी लवकरच परतला .
गोविंद सकाळी दात घासत असताना तुळसाच्या रूम च्या बाजूने चालत आला व आपल्या बहिणीच्या खिडकी बाहेर केशव ला पाहून गोविंदाच्या तळ पायाची आग मस्तकाला जाते गोविंद काही एक न पाहता केशव च्या लात मार मारतो केशव वेदनेने किंचाळून उठतो व त्या आवाजाने तुळसा देखील घाबरून जागी होते केशव गोविंद ला पाहताच उठून पळत सुटतो गोविंद देखील केशव च्या मागे पळू लागतो . )
तुळसा ~ ( आपल्या डोळ्या समोर त्या दोघांना पळतांनी पाहून)
दादा थांब नको मारू त्याला दादा Please थांब दादा
( केशव कसा बसा गाडी पर्यंत पळत जातो व गोविंद आजू बाजूला कोणी पाहू नये ह्या भीतीने थांबून घेतो )
{दृश्य~५}
गोविंद - काय चाललंय माधव नाना
माधव - काय नाय गोविंद, गाईचं वासरु मोठ झालंय एखल्या माणसाला आकळत नाय बघ, म्हणून म्हटल यसनं घेऊन जावा
गोविंद - अच्छा... मग एक कशाला दोन घेऊन जावा की
माधव ~ नाय नको एकीने भागल माझं
गोविंद ~ नको काय नाना एक वासराला घाला आणि एक तुमच्या पोराला घाला
माधव ~ म्हणजे
गोविंद ~ म्हणजे अस आहे ना नाना फक्त वासरु च नाय तर तुमच्याहून तुमची पोरं पण आकळांना झाल्यात बघा
माधव ~ गोविंद अरे जिभेला हाड राहत नाही म्हणून उचल जीभ आणि लाव टाळूला आस ही नको करायला माणसाने
गोविंद ~ हो मग आपल्या अंथरुणाच्या हद्दी सोडून पाय देखील नको पसरवायला माणसाने
माधव ~ जे काय बोलायचं ते सूट सुटीत बोल, नको ते कोढे नको घडवूस
गोविंद ~ अच्छा, तुमच्या पोराला विचारा की काल रातच्याला कुठं होता म्हणून
माधव ~ कुठ होता काय , मक्याला पाणी भरायचं
होत काल रातच्याला बाऱ्यावर होता पोरगा
गोविंद ~ हो का , कुठ माझ्या घरा शेजारी मक्का लावलय वय तुम्ही ,
शेवटच सांगतो नाना केशव तुमचा मुलगा हाय म्हणून सोडला त्याला पण इथून पुढ जर माझ्या बहिनिकड
फिरून जरी बघितलं तर लय जड जाईल त्याला सांगून ठेवतो मी.
माधव ~ ये गोविंद रामपहरी नको ते आळ घेऊ नकोस, आर... पूर्ण गावाला माहित हाय माझा केशव कसा हाय ते . जाऊन विचार रस्त्यानं चालताना खालची मान वर करून साधा बघत नाय कुठल्या मुलीला
गोविंद ~ मी गावातल्या लोकांना विचारण्या पेक्षा तुम्ही तुमच्या पोराला विचारा मग समजेलच मी खोटे आळ करतोय की खरं ते बोलतोय
माधव ~ बर, तुझा तोंडावर खर~खोट नाय केलं तर नावाचा माधव नाय, पण एक लक्षात घे गोविंद हा आळ खोटा ठरला तर पंचायत समोर ओढून काढील
गोविंद ~ अरे पंचायत समोर तर मी तुमच्या बाप लेकाला ओढलं पाहिजे
माधव ~ ते पाहूच कोण कोणाला ओढत ते
{दृश्य~६}
( रागात तापलेला माधव दुकानातून घरी येतो व सकाळी जे काही झालं ह्या विचारात बुडालेला केशव च्या गच्ची ला पकडून विचारतो )
माधव ~ काल रातच्याला कुठ होता
केशव ~ ( घाबरत )
कुठ होता म्हणजे शेतावर होतो
माधव ~ खर बोल गोविंद च्या बहिणीला भेटायला गेला होता ना
केशव ~ ( हे सगळ लपवण्यात काहीही अर्थ नहीं म्हणून कबुली देत )
होय आबा आम्ही दोघं एकमेकांवर प्रेम करतोय
माधव ~ हे बघ लेका प्रेम वगैरे आस काहीच राहत नाही , नोकरी असो किंवा व्यक्ती लोकं नेहमी चांगल्याचा शोधात असतात
केशव ~ ते असतील कुणी लोकं मी माझ्या तुळसा ला चांगलं ओळखतोय
माधव ~ अरे तिच्या भावाने पंचायती समोर ओढण्याची धमकी दिली आहे
( तेवढ्यात माधव चा फोन वाजतो )
हे बघ आला सरपंचाचा फोन
केशव ~( पंचायत मध्ये जायला निघतो )
चला जाऊया मग
माधव ~ नहीं नको उगाच विषय वाढून जाईल तू नको येऊ ( व माधव एकालाच जातो )
( गावातल्या गावात लग्न करुन देणे म्हणजे गावातल्या लोकांना समजून जाणे की याचं काही लफड असणार गोविंद आपली व आपल्या बहिणीची इज्जत
झाकण्या साठी व माधव आपल्या मूलाचा जीव धोक्यात न यावा म्हणून गोविंद व माधव तिसऱ्या व्यक्तीच्या सांगण्या वरून गोविंद त्याचा बहिणीला व माधव त्याचा मुलाला एकमेकांच्या विरोधात भरीवर घालतात)
(माधव केशव ला सांगतो की तिने सांगितलं की त्यानेच माझा भाऊ घरी नसताना दार वाजवले व मुलगी आपल्या शब्दा वरून बदलून गेली आणि गोविंद तुळसा ला सांगतो की त्याच आणखी एक दोन मुलींन सोबत प्रेम संबंध आहे आस तो स्वतः कबूल झाला आहे. अशा खोट्या गोष्टी सांगून दोघांचे प्रेम संबंध संपवतात त्या नंतर केशव शहरात नोकरी च्या शोधात किंवा म्हणता येईल की तिच्या आठवणी पासून दूर निघून आला व माघे तुळसा चे काय झाले हे कधीही त्याने जाणून घेण्याचे प्रयत्न केले नाही )
{दृश्य~७} वर्तमानकाळ
( तेवढ्यात हातातील पत्र फॅन च्या हवेने वाजू लागतो व केशव जुन्या आठवणीतून बाहेर येतो व पत्रातील शेवटची ओळ वाचतो )
तुझीच,
ती – हरवलेल्या हळव्या प्रेमाची साक्षीदार
समाप्ती
लेखक :~ समीर लांडे