Samir Lande 08 Jan 2026 कहानियाँ प्यार-महोब्बत Samir Lande, नक्षत्रा 2, समीर लांडे मराठी कविता , प्रेम, हळवे मन 9759 0 Hindi :: हिंदी
डोक्यावरती केस तिचे, संध्येची रेशीम छाया, रात्रीला पडलेले तारे, विणत बसले जाया, भांग जिथे पडते तेथे क्षण थांबतो अवकाश, मौनही नतमस्तक होई, पाहून तिचा प्रकाश. भुवया कमानीसारख्या, धनुष्याची रेष, नजरेत अडकतो काळजाचा प्रत्येक देश, डोळ्यांत खोल सागर, काजळ त्यात हरवून, एकदा पाहिलं की मन जातं कायमच बुडून. नाकावर नथ नाही, हीच थोडी उणीव वाटे, असती जर ती चमकदार, तर गर्दीच पेटे, एका नजरेतच किती तरी काळजं अडके, श्वासही थांबून जाई, डोळेही न फडके. नथ नसली तरी रूप तिचं कमी नाही जरा, पण नथ असती तर सांभाळणं झालं असतं खरा, रुदयांवर रुदय पडले असते थरथर, साधेपणातच तिचं सौंदर्य शांत पण जहर. गळ्याभोवती मानेची, कोवळीशी वळणं, घामाचा थेंब चालतो, जणू प्रेमाचं लेखन, हंसुलीवरती सावली, साडी हलकेच खेळे, डोळे खाली जाताना शहाणपणच वेडे. कंबर वळते लयीने, साडीचं स्वप्न साजे, चालण्यात तिच्या ताल आहे, नृत्यही लाजे, पायात पैंजण वाजती, वेळ थांबून ऐके, डोक्यापासून पायापर्यंत सौंदर्यच बोले. कवी: समीर लांडे एक हळव्या मनाचा प्रवाशी