Samir Lande 09 Apr 2023 कविताएँ अन्य समीर लांडे , Samir Lande, love, broken heart, shayri, kavitaye,sad love, love story 32416 0 Hindi :: हिंदी
लहान आहेस, तू खूप छान आहेस.
माझ्या फिकट जीवनातील एक रंगीत पान आहेस.
शाहान पण दाखवते म्हणा नुकतीच
पन ते काही दिसत नाही.
नुकतीच वाढलीस वयाने, पण बुद्धी मते ने नाही.
राग ही येतो , येते प्रेम ही तुझ्यावर,
कित्तेकदा तुझ्या वरचा राग मी घ्यायचा नाही मनावर.
टोचतो मी, माझ प्रेम, माझी काळजी तूला,
पण तुझेही शब्द टोचतात ग माझ्या मनावर.
आवडत चिडवायला बुटकी, जाडी,
कधी प्रेमाने लाडू ही म्हणतो तूला.
पण तूही कूठे ऐकतेस, ज्या गोष्टी करिता नाही
म्हणून सांगितल, त्याच गोष्टी करून दाखवतेस मला.
तरीही तू आवडतेस मला.
- समीर लांडे