Samir Lande 04 Jul 2023 कविताएँ समाजिक Samir Lande, समीर लांडे, पैशाने देह विकली जातात, love broken heart shayri प्रेम कविता मराठी कविता संग्रह 27591 0 Marathi :: मराठी
एक स्वप्नच जणू पडले ,
जे पूर्ण बगताच आले नाही.
आख्खी रात्र जागून काढली मी,
पुन्हा झोपता आले नाही .
आता खिडकीत ही कुढे चंद्राचे दर्शन होतात ?
नातलगांन प्रमाणे, ढग नेहमीच आडवे येतात.
रात्रीच्या काळोखात उचलतो पेन,
दिवसा तर अश्रू दिसून येतात .
शब्द तर होतात संपेना से माझे,
पण वहीची पानं नेहमीच संपली जातात.
फेरफटका मारताना प्रेमाच्या बाजारात,
समजले मला, इथे पैशाने देह विकली जातात ...
शब्द :- समीर लांडे