Kartika Thorat 17 Jun 2026 कविताएँ प्यार-महोब्बत 🌹 "प्रेम हे सांगून होत नाही, ते मनातून उमलतं." 🌹 248 0 Marathi :: मराठी
प्रेम म्हणजे सुंदर भावना, मनाला देणारी नवी चेतना. तुझ्या हसण्यात माझं जग दडलं, तुझ्या आठवणीत मन हरपलं. शब्द न बोलता जे समजतं, तेच खरं प्रेम असतं. तुझ्या सोबतीने प्रत्येक क्षण खास, तुझ्याविना मात्र सगळंच उदास. प्रेम म्हणजे विश्वासाचा धागा, जो जोडतो दोन हृदयांना एका नात्याने सखा.