ज्योती महादुले 26 Apr 2023 कविताएँ बाल-साहित्य Jyoti 51810 1 5 Marathi :: मराठी
तुन रे पुस्तका कशी जादू केली नको नको म्हणताना तुझ्याशी मैत्री झाली तुझ्यात डोकवता शब्द आलिंगन करतात अनोख्या दुनियेत मज घेऊन जातात खेळ खेळतात विविध ते माझ्याशी तुन रे पुस्तका...... तुझ्या कवितांची गंमत न्यारी शब्दांच्या वेलींवर मी रमतो रमतो असा की तु हात पकडतो आणखीनच तुझी,माझी होते घट्ट मैत्री तु माझा सखा,मी तुझा जिवा अशी आहे अपुली निर्मळ नाती तुन रे पुस्तका............ तुझ्या पाठांची दुनियाच भारी विविध माहितीचे मज घोट पाजी हे नवख्या सुरांच्या बागेत फिरवी गप्पा करता मज्जा येई डोंगर दर्याशी तुझ्या सारखा सखा मजला नाही तुझ्यावर जडली जिवाभावाची प्रिती तुन रे पुस्तका....
3 years ago